ती चार वर्ष....

आता फ़ार फ़ार तर एक दोन महीने उरले आहे. सगळे आता शेवट्च्या फ़ायनल सबमिशनला आणि तोंडी परीक्षेच्या तयार प्रोजेक्ट्चं काम पण जोरात चालू आहे. असाइनमेंट, प्रिंट-आउट्स, फ़ाइल्स आणि प्रोजेक्ट रिपोर्ट यात सगळे एवढे गुंतलेत की क्षणभराची विश्रांती ही आता उसनी घेउन साजरी करावी लागेल. ह्या घाई गडबडीत ना मेंदूला आराम आहे ना शरीराच्या इतर अवयवांना.
यंत्रवत हात चालत आहेत असाइनमेंट छापण्यासाठी आणि झपझप पावलं उचलली जातायत फ़ाइल चेकींग च्या धावपळीत.

सबमिशनचे मागचे सात सिझन पार केले आणि आत आठव्या सबमिशनच्या टप्प्यावर पोचलोय. कॉंउट्डाउन खरचं सुरु झालाय आता कॉलेज जीवनाच्या संपतानाचा. यापुढे ते ९ ते ५ चं कॉलेज नसेल, ते खडूस वाटलेले प्रोफ़ेसर नसतील, ते रटाळ लेक्चर्स नसतील, ते जीवाभावाचे मित्र यापुढे सहवासात नसतील, ती डिफ़ॉल्टर लिस्ट, ती मासबंकची मजा, ती मिडटर्म मधे केलेल्या कॉपीची गंमत, ती प्रक्टीकलच्या नावाखाली मित्रांत बसून केलेली टवाळखोरी आणि ती कॉलेज ट्रीपची धमाल यापॆकी काहीही नसेल.

वेळ खरचं कुणासाठी थांबत नसतो हे राहून राहून अशा क्षणी फ़ार जाणवतं. शाळेचा फ़ेअरवेल होता त्या दिवशी ही काही अशाच भावना होत्या आणि आजही त्यात किंचीतसाच बदल असेल.
कॉलेज फ़ेअरवेल थोड्या दिवसांवर येउन ठेपलयं. त्यापुढे तोंडी परीक्षा मग लेखी परीक्षा मग कॉलेज जीवनाला रामराम.
पण मन अजूनही ही गोष्ट मानायला तयार नाही. गेल्या ४ वर्षातल्या आठवणींचा एक चित्रपट स्वप्नवत डोळ्यांसमोरुन सरसरता होतो. ४ वर्षाचा हा प्रवास रोमांचक आणि गमतीशीर करणारे माझे मित्र उद्या कॉलेज संपल्यावर पुन्हा कधी एकत्र भेटणार नाहीत ही बोचणी मनाला आहे. कॉलेज संपताच सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे होतील.
 ‎
 ‎ती सकाळाची stand वर गर्दी नाही,
 ‎ते first lecture ला वेळाने जाने नाही,
 ‎तो दुपरचा टिफन नाही,
 ‎आणि tiffen नंतर canteen मधे चहा नाही,
 ‎ते mesa साथी college नंतर थंबने नाही,
 ‎4 वर्ष कधी गेले कलळेच नाही,
 ‎exam fee साठी line नाही,
 ‎ebc च टेंशन नाही,

Mechanical च उपाशी मंडळ नाही..
CSE ची हिरवळ नाही
Civil चा दंगा नाही..
Chemical ची nuclear power नाही.
Electronic च सर्किट नाही...
 ‎
 ‎gathering चे शेवटचे दोन दिवस काय जाल अजुन समजना...ते स्टेज नाही.. तो डांस नाही....
 ‎ति बैकस्टेज masti नही....
 ‎जे चार वर्षा मधे डोळ्यात पानी न येणारे हुंडके देउन रडत होतो.....आणि वेड्या सारखे junior ला पन रडवल..

इतके emontional आर्टिकल मि पहिल्यांदाच लिहिला आहे
मलाच माहीत नाही.. हे लिहितना कितिवेल माजे डोळे ओले जाले

पुढे ९ ते ५ ची नोकरी असेल, नवे मित्रही असतील, नवी आव्हानं असतील, कामावरच्या नवीन समस्या आणि काही नवे अनूभव व रोमांचक क्षण. पण हे सर्व असतानाही तो शाळेचा वर्ग, ती मस्ती, तो कॉलेज कट्टा, ती धमाल नेहमीच आठवत राहील.

हे वाचून खुप जनाचे डोळे ओले होनार हे नक्की पन भावनेच्या बरात कधी शब्द बाहेर पडले हेच कळले नाही...
ती चार वर्ष.... ती चार वर्ष.... Reviewed by Ronak shah on February 28, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.